बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महागाईचा कहर! आता खाद्यतेलाच्या किंमती तब्बल ‘इतक्या’ टक्यांनी वाढल्या

नवी दिल्ली | मागील दोन महिन्यांपासून सामान्य जनतेला महागाईचा फटका बसताना दिसत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वर चढत असताना दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती देखील वाढल्या होत्या. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 822 रूपयांवर पोहचली होती. तर आता खाद्य तेलाच्या किंमतीत देखील वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे.

कच्च्या मालाचा तुटवडा, आयातीवरचा वाढत असलेला खर्च आणि त्याच इंधन दरवाढीमुळे भारतात खाद्य तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल 25% नी खाद्य तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तर या महिण्याच्या अखेरीस खाद्यतेलाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहीणींना याचा आणखी मोठा फटका बसणार आहे.

खाद्यतेलाच्या बाबतीत भारत एक प्रमुख आयातदार आहे. भारत दरवर्षी 70% खाद्यतेल आयात करतो. यंदा पिकांच्या नुकसानीत वाढ झाल्याने खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर सोयाबीन आणि सुर्यफुलाच्या किंमतीत देखील वाढ पहायला मिळत आहे. तर विदेशात देखील खाद्यतेलाच्या उत्पादनात घट पहायला मिळत आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया यांसारख्या देशांनी निर्यात शुल्कात 30% पर्यत वाढ केली आहे.

दरम्यान, भारत सरकारने आयात शुल्कात 10% ची घट केली असली तरी त्याचा फारसा परिणाम भाववाढीवर होताना दिसत नाही. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर होणारे बदल हे या दरवाढीची कारणे सांगितली जात आहे. तर मोगरीचं आणि सरकीच्या तेलाच्या किंमती इतर तेलांपेक्षा काही प्रमाणात कमी आहेत.

थोडक्यात बातम्या- 

भाजपच्या या आमदाराने योगी आदित्यनाथांसोबत केली छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना; म्हणाले

राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरु, शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक

पुढील दोन दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या कारण!

‘या’ भाजप खासदाराच्या सुनेनं कापली हाताची नस, केले ‘हे’ धक्कादायक आरोप

बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आमदार संभाजी पवार काळाच्या पडद्याआड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More