बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वादग्रस्त पु्स्तकावरून लेखक गिरीश कुबेर यांच्याविरोधात पुण्यात तक्रार अर्ज दाखल

मुंबई | संपादक गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. त्यांच्या या पुस्तकामध्ये मराठा साम्राज्याचे दुुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह लेखन केलं होतं. त्यामुळे गिरीश कुबेर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता पुण्यात भाजपने गिरिश कुबेर यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पुणे भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष महेश पवळे यांनी गिरीश कुबेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामवंत इतिहासकारांनी खोटी माहिती खोडून खरा इतिहास सर्वांसमोर आणला होता. त्याचे सर्व संदर्भ उपलब्ध असताना देखील गिरीश कुबेर यांनी खोटी माहिती का छापली?, याची चौकशी होणं गरजेचं आहे, असं महेश पवळे यांनी सांगितलं आहे.

गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर संभाजी ब्रिगेड संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, भाजप आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. तर खासदार संभाजीराजे यांनी देखील गिरीश कुबेर यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती. तर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील कुुबेरांवर टीका केली होती.

दरम्यान, कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केलं याची माहिती मिळाली पाहिजे. गिरीश कुबेर तुम्ही मर्यादा सोडून हे लेखन केलं आहे, त्यामुळे मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही, असं ट्वीट भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

उसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाचा कोरोनाने मृत्यू!

“खोकला, शिंकणे किंवा बोलल्यानं कोरोना हवेत पसरतो अन्…”

धक्कादायक! कर्मचारी ऑक्सिजन सपोर्टवर असतानाही जबरदस्तीनं बोलवलं कामावर अन्…., पाहा व्हिडीओ

देसी जुगाड! वाफ घेण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 3.15 लाखांवर, पाहा आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More