बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात ED चं मोठं पाऊल!

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स बजावूनही ते गैरजर राहिले आहेत. तसेच त्यांचा ठावठिकाणाही लागत नाहीय. यामुळे ईडीने त्यांना शोधण्यासाठी सीबीआयची मदत मागितल्याचं कळतंय.

ईडी आणि सीबीआय दोन्ही तपास यंत्रणा राज्यभरात ठिकठिकाणी अनिल देशमुखांना शोधण्यासाठी छापेमारी करण्याची शक्यता आहे. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे.

अनिल देशमुख यांच्या या प्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा प्राथमिक चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी त्यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे निरीक्षक अभिषेक तिवारी यांना दिल्ली न्यायालयाने दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती

सीबीआयने या दोघांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. तिवारी हे वकील डागा यांच्या संपर्कात होते. त्यांच्यातील संभाषण हाती लागल्याने आणि पुरावे मिळाल्यावर या दोघांनाही अटक केल्याचं सीबीआयने न्यायालयात सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

छोट्या कियाराचा सोशल मीडियात धुमाकूळ; व्हिडीओ तुफान व्हायरल

मोठी बातमी! किंग कोहली कर्णधारपदावरून होणार पायउतार?, ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयची नजर

“भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला पैशांची ऑफर दिली होती, पण मी पैसे न घेता पक्षात आलो”

रहाटणीतील ‘लेगसी ऑरा’ चा अनोखा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव!

पुण्यात बिग बास्केट कंपनीला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More