बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलैचा दुसरा आठवडा महत्त्वाचा, शिक्षणमंत्र्यांनी सांगितली निकालाची तारीख!

मुंबई | दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. 10 वीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

दहावीचा निकाल 9 वी आणि 10 वीच्या घेण्यात आलेल्या परीक्षांवर आधारित असेल. तसेच जे विद्यार्थ्यी आपल्या गुणांबाबत समाधानी नाही, ते विद्यार्थी नंतर परीक्षा देऊ शकतात, असं महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी सांगितलंय.

राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केलं जाईल आणि त्यांच्या गुणांचे अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण दिले जातील. तसंच मूल्यांकन निकष देखील लवकरच जाहीर केले जातील, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

विद्यार्थ्यांसाठी जुलैचा दुसरा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic वर जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जावं. होम पेजवरील SSC परीक्षा निकाल 2021 लिंकवर क्लिक करा. एक नवीन पेज स्क्रीनवर दिसेल. आपल्या रोल नंबरसह मागितलेली अन्य माहिती येथे भरा. सबमिट वर क्लिक करा. त्यानंतर  SSC निकाल 2021 आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.

थोडक्यात बातम्या- 

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ‘भारत बायोटेक’ला मोठा फटका; इतक्या कोटी डॉलर्सचा करार स्थगित

“शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही मानत असाल तर…”

तासाभरात होत्याचं नव्हतं झालं; रिमोटची बॅटरी गिळल्याने अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

‘जा आणि मरा…तुमची जी इच्छा आहे ते करा’; पालकांच्या प्रश्नांवर शिक्षणमंत्री भडकले

गोव्यात जाण्यासाठी कोविड निगेटिव्ह रिपोर्टची गरज नाही; फक्त ‘ही’ अट करावी लागेल पूर्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More