महाराष्ट्र मुंबई

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण!

मुंबई | ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत कोरोना झाल्याचं सांगितलं आहे. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

माझ्या तपासणी दरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. पण माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी, सुरक्षित राहा, काळजी घ्या, असं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

चेन्नईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई; सलामीवीर संजू सॅमसन, स्मिथची धडाकेबाज अर्धशतकी खेळी

अभिनेत्री पायल घोषने मानले कंगणा राणावतचे आभार म्हणाली…

“…तर मनसे मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल”

धक्कादायक! देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 55 लाखांचा टप्पा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या