बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

11 वीच्या प्रवेशाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई | कोरोनामुळे बारावीपाठोपाठ दहावीची परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे आता 11 वीचा प्रवेश कशाच्या आधारावर देणार?, याबाबत पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही संभ्रम होता. मात्र यावर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे.

अकरावीचे प्रवेश गुणवत्ता यादीनुसार व्हावेत यासाठी राज्य सरकारने सीईटी परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला आहे. ही सीईटी परीक्षा जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी खालील माहिती जाहीर करण्यात आली आहे.

ही परीक्षा वैकल्पिक असून सीईटीला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी मात्र प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे स्पर्धात्मक महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटीच्या माध्यमातून प्रवेशाची जागा सुरक्षित करता येणार आहे. अकरावी प्रवेशासाठीची ही सीईटी परीक्षा एसएससी बोर्ड, सीबीएसई, सीआयएससीई आणि सर्व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. सदर 100 गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसेच OMR पद्धतीने 2 तासांची परीक्षा घेण्यात येईल.

दरम्यान,  इंग्रजी, गणित,विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील.परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे. इयत्ता 10 वीचा निकाल साधारणत 15 जुलै दरम्यान लागल्यानंतर राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्र अनलॉक मात्र ‘या’ जिल्ह्याची चिंता वाढली; एका दिवसात आढळले तब्बल 695 रुग्ण

घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका; ‘या’ 7 जिल्ह्यांमुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज फक्त 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर एकही मृत्यू नाही

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More