बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा! 15 जुलैपासून ‘या’ गावांमध्ये शाळांची घंटा पुन्हा वाजणार

मुंबई | जवळपास गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने देशात थैमान घातलं आहे. कोरोनामुळे कित्येक शाळांना लागलेली कुलूपे अद्याप उघडली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाल्याने सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच आता शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोनामुक्त झालेल्या विभागातील शाळा पहिल्या टप्प्यात सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.  कोविडमुक्त क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग कोविड निकषांच्या आधारे सुरु करण्यात येतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांंनी दिली आहे. आज त्या हिंगोली येथे माध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की,  मागील महिनाभरापासून एकही रुग्ण न आढळलेल्या ठिकाणी 15 जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जातील. यासाठी गावाने जबाबदारी स्वीकारावी. शाळा सुरू करण्यासाठी अनेक नियम लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान, वर्ग सुरू करण्यापुर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा. पालकांना शाळेच्या आवारात येण्यास मनाई करावी. तसेच ग्रामपंचायत स्तरावर एक समिती गठीत करावी, शाळा सुरू करायची की नाही हा निर्णय ही समिती घेईल, असे नियम शाळांना लागू करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या –

मला सुत्र द्या आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो- देवेंद्र फडणवीस

सोन्या-चांदीच्या दरात आज देखील मोठी घसरण, पटापट तपासा ताजे दर

शाहिद कपूरच्या बायकोची ऑनलाईन फसवणूक; फोटो शेअर करत म्हणाली…

“55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, 50 नगरसेवकांमध्ये पिंपरी चिंचवडचा महापौर का होणार नाही?”

“मला आणि कराडांना गोपीनाथ मुंडेंनीच घडवलं, आम्ही साहेबांचेच कार्यकर्ते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More