बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या!

हिंगोली | काँग्रेस नेत्या आणि शालेय शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला हिंगोलीमध्ये अपघात झाल्याची माहिती समजत आहे. वर्षा गायकवाड यांच्या गाडीला पिकअप टेम्पोने धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणीतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजत आहे.

संबंधित टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हिंगोलीमधील रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी त्यांच्या गाड्यांच्या ताफा शहरात आला होता.  दुपारच्या वेळेत म्हणजे 12.30 च्या सुमारास शहरातील पिपल्स बँकेजवळ एका पिकअप टेम्पोने त्यांच्या ताफ्याला धडक दिली.

धडक झाल्यावर चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीचा वेग वाढवला त्यामुळे टेम्पो मागील बाजून घासून गेला. धडकेत कोणालाही इजा झाली नाही. या धडकेनंतर काहीवेळ त्यांचा ताफा थांबला होता मात्र थोड्यावेळाने त्या नियोजित दौऱ्यावर मार्गस्थ झाल्या.

दरम्यान, पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं असून शहर पोलीस स्टेशनमध्ये त्याला नेण्यात आलं आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

थोडक्यात बातम्या- 

नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू – चंद्रकांत पाटील

“शिवसेनेला आता वन खात्याची गरज नाही, कारण सेनेत आता वाघच शिल्लक राहिले नाहीत”

हरभजन सिंग पुन्हा बाबा झाला, पत्नी गीता बस्रानं मुलाला दिला जन्म

‘इयत्ता पाचवीवरील मुलांसाठी मोफत कंडोमची व्यवस्था करा’; शाळांना अजब आदेश

‘या’ जिल्ह्याला मिळाले कोरोना लसीचे तब्बल 60 हजार डोस; आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर लसीकरणाला सुरुवात!

‘म्हातारी असेल तुझी आई…’, ट्रोल करणाऱ्यांना कविता कौशिकनं झापलं

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More