लहानपणी मलाही गणित हा विषय अजिबात आवडायचा नाही!

Vinod Tawade
शिक्षणमंत्री विनोद तावडे

मुंबई | लहानपणी मला गणित हा विषय अजिबात आवडायचा नाही, असी कबुली शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलीय. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मला गणित हा विषय अजिबात आवडायचा नाही, परंतु ज्यावेळी शिक्षकांनी गणिताशी संवाद साधायला शिकवले त्यावेळी या विषयात मला रूची यायला लागली, तेव्हा तुम्हीसुद्धा अभ्यास करताना विषयाशी एकरूप होऊन संवाद साधा, असं तावडे यांनी सांगितलं.

दैनंदिन जीवनाच्या तणावापासून दूर राहण्यासाठी लहान मुलांमध्ये मिसळलं पाहिजे, असंही ते म्हणाले