दहावी आणि बारावी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या…
मुंबई | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन तर संचारबंदीचे निर्णय घेण्यात आले. त्यासोबतच शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशाप्रकारे होणार त्यांच्या तारखा काय याविषयीचे अनेक प्रश्व पालकांच्या आणि मुलांच्या मनात होते. मात्र याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे.
दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार आहे. कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार आहेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरवर्षी 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 3 तास वेळ दिला जात होता. परंतु यावर्षी विद्यार्थ्याचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 40 आणि 50 गुणांच्या परिक्षेसाठी 15 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे.
दरम्यान, दहावीच्या प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने घेतल्या जाणार आहे. विशेष म्हणजे हे असाईनमेंट लेखी परीक्षा संपल्यानंतर शाळेत गृहपाठ पद्धतीने द्यायचे आहेत. त्यासोबतच परिक्षेच्या काळात जर विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली असेल तर त्यासाठी विशेष परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे.
Hats off to our students who have braved this tough academic year. To help them, here are some concessions and guidelines for the final exams. For FAQs, referhttps://t.co/KX9sqYrmnj pic.twitter.com/BX0873EFVM
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 20, 2021
थोडक्यात बातम्या-
‘ती’ 45 मिनटं आमच्यासाठी खूप मोठी…; व्हाॅटस अॅपने मानले यूझर्सचे आभार
धक्कादायक! महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसोबत विहिरीत उडी घेत संपवलं आयुष्य
‘या’ कारणामुळे 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणं महागणार!
एक दोन नव्हे तर सलग तीन वेळा जो बायडन विमानात चढताना पडले, पाहा व्हिडीओ
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खूप अभ्यास केलाय; आम्हा डॉक्टरांपेक्षाही त्यांना कोरोनाचं जास्त ज्ञान”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.