पंडित नेहरु आणि माझ्या आईमध्ये फक्त प्रेमसंबंध होते!

File Photo

नवी दिल्ली | पंडित नेहरु आणि माझ्या आईमध्ये फक्त प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यात कोणतेही शारिरीक संबंध नव्हते, असा खुलासा एडविना माऊंटबॅटन यांची मुलगी पामेला हिक्स यांनी केला आहे.

पामेला यांचं ‘डॉटर ऑफ एंपायर : लाइफ अॅज ए माउंटबॅटन’ पुस्तक लवकरच भारतात प्रकाशित होणार आहे. त्या पुस्तकात हा खुलासा आहे.

दरम्यान, दोघांमध्ये असलेल्या संबंधाबाबत जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. पंडित नेहरू यांना माझ्या आईनं एक पत्र लिहिलं होतं, ज्यामुळे मला त्यांच्या पारदर्शक मैत्रीची कल्पना आली, असंही त्यांनी या पुस्तकात म्हटलंय.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या