आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ‘ही’ 10 कामं सुरूच राहणार!

मुंबई | निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद परिषद आज दिल्लीत पार पडली. महाराष्ट्र हरियाणा राज्याच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रची निवडणूक 21 ऑक्टोबरला होईल, अशी माहिती केंद्रीय आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली आहे.

आजपासून महाराष्ट्र आणि हरियाणात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान आणि 24 ऑक्टोबरला निकाल लागणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने, विमाने आणि हेलिकॉप्टरचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. तसंच सरकारी मालमत्ता, सरकारी गेस्ट हाऊसमध्ये हक्कही गाजवता येत नाही. मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतरही खालील कामे सुरूच राहणार आहेत.

1. पेंशनचं काम
2. आधारकार्ड बनवणं
3. जाती प्रमाण पत्र बनवणं
4. वीज आणि पाण्यासंबंधी काम
5. साफसफाई संबंधी काम
6. वैद्यकीय उपचारासंबंधी मदत घेणं
7. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम
8. सुरू असलेला प्रकल्पही थांबणार नाही
9. आचारसंहितेचं कारण पुढे करून अधिकारी तुमची ही कामं टाळू शकणार नाहीत
10. ज्या लोकांनी घराच्या आराखड्यासाठी आवेदन दिलंय, त्यांचे आराखडे पास होतील. पण नवीन आवेदनं स्वीकारली जाणार नाहीत.

महत्वाच्या बातम्या-