बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रूग्णांसाठी ‘हे’ प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा

नवी दिल्ली | सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होत असल्याची मोठी समस्या समोर येत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आता ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ या अँटी-कोविड औषधाला आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओने यासाठी परवानगी देखील मागितली आहे. हे औषध रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांच्या जलद रिकव्हरीसाठी मदत करतं, त्यामुळे कोरोना रूग्णांना या औषधाची मदत होणार आहे.

डीआरडीओ आणि डॉ. रेड्डीज लॅब यांनी बनवलेले हे औषध डीसीजीआयच्या मंजुरीनंतर वापरात येणार आहे. या औषधामुळे ऑक्सिजनवर अवलंबून असलेले कोरोनाबाधित रूग्ण 2 ते 3 दिवसांत ऑक्सिजनच्या सपोर्टविना उपचार घेऊ शकतील, त्यामुळे रुग्ण लवकरच बरे होतील. लवकरच हे औषध रूग्णालयात उपलब्ध होईल. मात्र रुग्णांनी हे औषध फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावं, असा सल्ला सतीश रेड्डी यांनी दिला आहे.

डीआरडीओने विकसित केलेले हे औषध गोळी, सिरप, इंजेक्शन आणि पावडर स्वरुपात पाकिटामध्ये मिळणार आहे, जे औषध पाण्यात विरघळवून पिता येतं. हे विषाणू, संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन व्हायरल संश्लेषण आणि उर्जा उत्पादन थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते, असं देखील सतीश रेड्डी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, डीआरडीओच्या आयएनएमएएस  आणि हैदराबाद सीसीएमबी यांनी मिळून या औषधाची निर्मिती केली आहे. या औषधाला सध्या ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज असं नाव देण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अंगावर काटा आणणारा अपघात! गाडीची धडक झाल्यावर तरूण उडाला हवेत…, पाहा व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल

कोरोनामुळं अभिनेत्याचा मृत्यू, मृत्यूपूर्वी लिहिलेली धक्कादायक पोस्ट व्हायरल

बीडमधे पडला असला पाऊस, पाण्याचा लोंढा पाहून अचंबित व्हाल

कोवॅक्सिन ही 12 वर्षांवरील मुलांना देण्यास मान्यता मिळाल्याच्या व्हायरल मेसेज मागचं सत्य वाचा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More