बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोवर लस कोरोनावर प्रभावी; पुण्यातील महाविद्यालयाचं मोठं संशोधन

पुणे | सध्या कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरली असली तरी येत्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना काळात लसीकरणावर अनेक संशोधन करण्यात आले. कोरोनावर बाकीच्या लसी प्रभावकारी असल्याचं आता समोर येत आहे. त्यातच आता पुण्यातील प्रसिद्ध बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयानं एक संशोधन केलं आहे.

लहान मुलांना देण्यात येणारी मीजल्स लस म्हणजेच गोवर लस कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यात प्रभावी ठरत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयानं याबद्दलचं संशोधन केलं आहे. 1 ते 17 वर्षांपर्यंतच्या 548 जणांचा समावेश केला होता. कोरोनाची लागण झालेले आणि कोरोनाची बाधा न झालेले अशा दोन गटांत मुलांची विभागणी करण्यात आली होती. त्यांच्यावर हे संशोधन करण्यात आलं आहे.

मीजल्स लस कोरोना विरोधात 87 टक्के प्रभावी असल्याचं संशोधनातून समोर आलं. कोरोना महामारीवर आता जुनंच शस्त्र कामी येणार असल्यानं आता डाॅक्टर आणि शास्त्रज्ञांनी देखील सुटकेचा श्वास घेतला आहे. देशात तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता आहे, असं सांगण्यात येत आहे. ज्या लहान मुलांनी मीजल्स लस घेतली आहे. त्यांना कोरोनाचा धोका कमी असल्याचं संशोधनात समोर आलं आहे.

दरम्यान, मीजल्स आणि बीसीजी लस घेतली असल्यानं लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होत आहे. मीजल्स लस 1985 पासून भारताच्या लसीकरण कार्यक्रमाचा भाग आहे. लहान मुलांना मीजल्स लस दिल्यास कोरोनापासून त्यांचं संरक्षण होतं, याबद्दलचं संशोधन ह्युमन वॅक्सिन अँड इम्युनोथेरेपेटिक नावाच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 91 दिवसातील निच्चांकी, रूग्णसंख्येत 11 हजारांची घट

लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी बँकेत जास्त व्याजदर तर मॅकडॉनल्ड्समध्ये घसघशीत सुट

ED ची मोठी कारवाई ; अविनाश भोसलेंची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता सील

“जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्यांचा मुख्यमंत्री होईल,असं म्हटल्यास गैर काय?”

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईक यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More