बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एक असं गाणं ज्यानं मराठा समाज पेटून उठला!

मुंबई | मराठा आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरवल्यानंतर मराठा समाजाने एकच जल्लोष केला आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा पुन्हा घुमू लागल्या आहेत.

मराठा आरक्षणाच्या लढ्यात अनेकांनी खारीचा वाटा उचलला. त्यापैकी एक म्हणजे ‘एक मराठा, लाख मराठा’ हे गीत. संपूर्ण मराठा क्रांती मोर्चांमध्ये हे गीत वाजत राहिलं. मराठा समाजात स्फुलिंग चेतवण्याचं काम या गाण्यानं केलं. आजही मराठा समाज जल्लोष करत असताना हे गाणं अनेक ठिकाणी वाजवलं गेलं.

मराठा समाजाच्या तीन तरुणांनी एकत्र येत हे गाणं तयार केलं होतं. ऋषिकेश शिंदे, राज देशमुख आणि सुशांत जावक ही ती नावं आहेत.

मराठा आरक्षणाचं खरं श्रेय आण्णासाहेब पाटील आणि हुतात्मा गेलेल्या आमच्या बांधवांचं आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आमच्या मागणीला भाजप सरकारने न्याय दिला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे त्याचे आभार, असं या गाण्याचे निर्माते राज देशमुख यांनी ‘थोडक्यात’शी बोलताना सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-आज हे मराठा आरक्षण पाहायला काकासाहेब असायला हवा होता!

-आरक्षणाच्या निर्णयाने आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोप लागणार नाही- गिरीश महाजन

-कोर्टात मराठा आरक्षणासाठी लढणारा तो एक मराठा!

-मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मुस्लिम आरक्षणाबाबत अबू आझमी विधानसभेत आक्रमक

-आम्ही पावले उचलली होती… त्यावेळी शक्य नाही झालं पण आता प्रत्यक्षात- विरोधी पक्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More