मुंबई

भाजपच्या नाराज नेत्यांच्या भेटींचा सिलसिला सुरूच; तावडेंपाठोपाठ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला

मुंबई | भाजपमध्ये नाराजीनाट्य  संपण्याच नाव घेत नाहीये. अशातच भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंची भेट घेण्यासाठी थेट त्यांच्या घरी पोहोचले. त्यांना भेटण्यापूर्वी खडसेंनी माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. पंकजा मुंडे  या नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहे.

पंकजा मुंडेच्या फेसबुक पोस्ट ने राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला आहे. त्यातच येत्या 12 डिसेंबरला गोपिनाथ गडावर गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात समर्थकांना बोलावले असून या मेळाव्याचे विशेष आमंत्रण भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना दिलं आहे, त्यामुळे या मेळाव्यादरम्यान पंकजा मुंडे नक्की काय घोषणा करतात, याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळेेच पंकजा मुंडे आणि रक्षा खडसे यांचा पराभव झाला, असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले होते. खडसेदेखील गेल्या अनेक दिवसांपासून भाजप वर नाराज आहेत. हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांनी अनेक भाजपच्या नाराज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या परंतु आजची भेट विशेष आहे. या भेटीत पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांची पक्षातील सद्य स्थितीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या