महाराष्ट्र मुंबई

“नारायण राणेंना भाजपत कोण विचारतंय?, राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही”

मुंबई | येत्या 2021 च्या मार्च महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांनी राणेंवर निशाणा साधलाय. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

राणेंना भाजपत कोण विचारतंय? हे पंचांग घेऊन बसले आहेत. दरवेळी नव्या तारखा देण्यात काय तथ्य? त्यांचा पक्ष त्यांना किंमत देत नाही तर इतर काय देणार? सरकार आलं नाही म्हणून तडफड सुरू आहे, अशी बोचरी टीका एकनाथ गायकवाड यांनी केली आहे.

2021 च्या मार्च महिन्यानंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार सत्तेवर येणार. केंद्रातही भाजप आणि महाराष्ट्रातही भाजप सरकार सत्तेवर येणार. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि खासदार टेंपररी असून ते लवकरच लाँग रजेवर जाणार, असं नारायण राणे म्हणालेत.

दरम्यान, राणे यांनी गेल्या महिन्यात भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवलं जात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा ठाकरे सरकार कोसळणार, असं वक्तव्य राणेंनी केलंय.

थोडक्यात बातम्या-

1 जानेवारीपासून हे पाच नियम बदलणार; प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत!

“शेतकरी आंदोलन केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यावं, अन्यथा…”

कांदा निर्यातीवर घातलेली बंदी उठवली; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

धक्कादायक! पुण्यातील एअरहोस्टेस तरुणीसोबत घडली अत्यंत संतापजनक घटना

16 लाख रुपयांचा बकरा चोरणारे अखेर पोलिसांना सापडले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या