Top News महाराष्ट्र मुंबई

मी कृषीमंत्री होतो त्यावेळी शेतकऱ्यांवर…, एकनाथ खडसेंचा ठाकरे सरकारवर प्रहार!

जळगाव |  मी पाच वर्ष कृषिमंत्री असताना एकदाही खताची टंचाई निर्माण झाली नाही. पण आता सरकारचे शेतकऱ्यांकडे अतिशय दुर्लक्ष होत आहे, अशी टीका भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. परंतू या सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असं खडसे म्हणाले.

मी पाच वर्ष कृषिमंत्री असताना एकदाही खताची टंचाई निर्माण झाली नाही. माझ्या काळात खताचा पुरवठा व्यवस्थित होत होता. त्यावेळी तसंच उत्तम समन्वय होता . आम्ही युरिया खताचे दर हे स्थिर ठेवले. आता मात्र सरकारमधील कोणाचाच समन्वय राहिलेला नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं.

दरम्यान, साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. सरकारने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अक्षय कुमारने नाशिकपाठोपाठ मुंबई पोलिसांनाही केली मदत

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा सुशांतसिंग प्रकरणावरून उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

“सेनापती ठाम उभा राहिला मात्र नियतीने त्यांच्या आईची इहलोकीची यात्रा काल संपवली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या