Top News

एकनाथ खडसे उद्धव ठाकरेंच्या भेटीला; भेटीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा

मुंबई | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. खडसे शिवसेनेत प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात घडत आहे. त्यामुळे खडसे आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीत नक्की काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.

एकनाथ खडसे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी काल दिल्लीत होते. मात्र या भेटी होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा भेट घेतली. खडसे आता उद्धव ठाकरे यांची भेटीला पोहोचले आहेत.

Loading...

भाजपचा एक मोठा गट पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात घडत आहेत. यात एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची नावं आघाडीवर आहेत. खडसे या नाराज नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामुळे हा नाराज गट काही वेगळा विचार करू शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुक्ताईनगरमधून नाकारलेली उमेदवारी खडसेंच्या जिव्हारी लागली. त्यानंतर त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात आली. मात्र रोहिणी यांचा पराभव झाला. त्यानंतर खडसेंची नाराजी लपून राहिलेली नाही. आता ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे या भेटीनंतर खडसे काय बोलतात, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या