होय, भाजपने गरज पडेल तसा माझा वापर करुन घेतला- एकनाथ खडसे

जळगाव | पक्षाला गरज पडेल तसा माझा वापर करून घेतला, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे. भुसावळ येथे बहिणाबाई महोत्सवाच्या निमित्ताने आले असताना ते बोलत होते.

पक्षाने वाल्याचा वाल्मिकी करावा पण हे करत असताना पक्षच वाल्या बनू नये याचीही खबरदारी घ्यावी, असं त्यांनी म्हटलं. धुळे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने काही गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.  

खडसेंना भाजपने बाजूला सारल्याचा आरोप दैनिक सामनामध्ये करण्यात आला होता. त्यावर विचारले असता हे 100 टक्के खरं आहे, असं ते म्हणाले. 

गेली 40 वर्षे मी अव्याहतपणे पक्षाची सेवा करतोय, पक्षाला गरज पडेल तसा पक्षाने माझा वापर करून घेतला, अशी बोचरी टीका त्यांनी भाजपवर केलीय.

महत्वाच्या बातम्या-

-जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर!

-‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण

-मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ

-भाजपला मोठा झटका; मोदी सरकारमधील हा मंत्री काँग्रेससोबत जाणार???

-शेतकरी आक्रोश करत आहे, हे राज्य कारभारास लांच्छन- उद्धव ठाकरे