एकनाथ खडसेंचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसक़़डून(NCP) अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.
चाळीस वर्षे भाजप (BJP) साठी काम करून सुद्धा त्यांनी माझ्यामागे चौकशीचा-आरोपांचा ससेमिरा लावल्याची खंत एकनाथ खडसेंनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस आल्यानंतर भाजपमध्ये एक वेगळं राजकारण सुरु झालंय. तसेच पक्षातील अनेक नेते नाराज असून पक्ष सोडून माझ्यासोबत येण्यास तयार आहेत, असा मोठा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे.
ज्यांनी पक्षासाठी कष्ट केले, पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केला सध्या ते सगळे पक्षाच्या बाहेर असून ज्यांचा सबंध नाही ते पक्षाच्या आत आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केलीये.
थोडक्यात बातम्या
“पडद्यामागून कोणीतरी मुंडे, महाजन ही नावे देशाच्या राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करतोय”
कोरोनाने टेन्शन वाढलं; गेल्या 24 तासातील रूग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर
‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळ-वाऱ्यासह जोराचा पाऊस; हवामान खात्याचा मोठा अंदाज
“राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मुख्यमंत्रीपद सांभाळणं सोपं नाही”
‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का?’; विनायक मेटे संतापले
Comments are closed.