Top News

शिवसेनेत प्रवेश करणार का?; एकनाथ खडसे म्हणतात…

मुंबई | मी अजून कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं स्पष्टीकरण भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिलं आहे. ते शिवसेनेत प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर खडसेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

एकनाथ खडसे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी काल दिल्लीत होते. मात्र या भेटी होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा भेट घेतली. त्यानंतर ते आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे खडसे शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा होऊ लागली होती. त्यावर खडसेंनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपचा एक मोठा गट पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात घडत आहेत. यात एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची नावं आघाडीवर आहेत. खडसे या नाराज नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामुळे हा नाराज गट काही वेगळा विचार करू शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुक्ताईनगरमधून नाकारलेली उमेदवारी खडसेंच्या जिव्हारी लागली. त्यानंतर त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात आली. मात्र रोहिणी यांचा पराभव झाला. त्यानंतर खडसेंची नाराजी लपून राहिलेली नाही. त्यांनी ती वारंवार बोलू दाखवली. मात्र आपण कुठल्याही पक्षात जाण्याबाबत अजून निर्णय घेतला नसल्याचं खडसेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या