महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेला एक-दोन वर्ष मुख्यमंत्रिपद दिलं असतं तरी महायुतीचा मुख्यमंत्री झाला असता- खडसे

मुंबई | लोकांनी महायुतीला मतदान केलं होतं. महायुतीचाच मुख्यमंत्री व्हायला हवा होता, शिवसेनेला एक-दोन वर्ष मुख्यमंत्रिपद दिलं असतं… तरी प्रश्न सुटला असता, असं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्याच पार्श्वभूमीवर माजी शिक्षणमंत्री विनोद तावडेंची भेट घेऊन खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे.

ठाकरे सरकारच्या कामगिरीवर प्रश्न विचारला असता, कोणत्याही सरकारच्या  किंवा विरोधकांच्या  कामकाजाचं केवळ 8 दिवसात मोजमाप करता  येणार नाही, असं खडसे म्हणाले. सोबतच त्यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरेंचं आणि विरोधी पक्षनेते म्हणून निवड झालेल्या देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं.

जे यशाचं श्रेय घेतात, त्यांनी पराभवाचं पण घ्यावं, ज्यांनी नेतृत्व केलं, त्यांनी ती जबाबदारी घ्यावी, असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. बहुजन नेतृत्त्वाला डावलणं हे दुर्दैवाने घडलं आहे. त्यांना तिकीटं न देणं किंवा तिकीट दिल्यानंतर निवडणुकीत त्यांचा पराभव करणे असं हे घडलं आहे, असंही ते म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या