बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केलं हा तसाच प्रकार’; नाथाभाऊंचं फडणवीसांवर टीकास्त्र

जळगाव |  ओबीसी आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसींना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपने चक्का जाम आंदोलन केलं होतं. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जर तीन महिन्यांमध्ये आरक्षण मिळवून दिलं नाहीतर राजकीय सन्यास घेईल, असं वक्तव्य केलं होतं. यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा घोषणा वारंवार करतात. याआधी त्यांनी विदर्भाच्या मुद्द्याच्या वेळी आपण लग्न करणार नसल्याची भीष्मप्रतिज्ञा केली होती मात्र त्यांनी लग्न केलं. असा प्रकार आपण पुराणात पाहिला आहे. विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केलं होतं हा तसा प्रकार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी आपण राष्ट्रवादीशी युती करणार नाही असं म्हटलं होतं मात्र पहाटे शपथ घेतली. आता ते सत्ता दिली तर ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ म्हणतात, सत्ता नसेल तर मदत करणार नाही, असं वाटतं असल्याचं म्हणत नाथाभाऊंनी टीका केली. याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही फडणवीसांवर निशाणा साधला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तुम्ही फार गांभीर्याने घेतलं आहे. ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. परंतू त्यानंतर काय झालं आपण पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या घोषणा गांभीर्यानं घ्यायची गरज नसल्याचं म्हणत थोरातांनी फडणवीसांना टोला हाणला.

थोडक्यात बातम्या-  

…नाहीतर कोरोनाची तिसरी लाट येण्याअगोदर दुसरीच लाट परत उलटेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

“संजय राऊतांनी फडणवीसांची काळजी करण्यापेक्षा शिवसेनेची करावी”

प्रत्येक दलित कुटुंबाला 10 लाख रुपये मिळणार; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय

पाकिस्तानी तरुणी पडली भारतीय तरुणाच्या प्रेमात, देशात येण्यासाठी थेट मोदींकडे विनंती

दुर्दैवी! पैशांसाठी कुटुंबाला कोरोनाचं औषध म्हणून दिलं विष; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More