जळगाव | आता वर्ष उलटलं, अशीच पाच वर्ष निघून जातील आणि यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसावं लागेल, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
राष्ट्रवादीच्या सुरू असलेल्या संवाद यात्रेसाठी एकनाथ खडसेंनी जळगावमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोले हाणले.
कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून काही गोष्ट कराव्या लागतात. कार्यकर्ते थांबवून ठेवण्यासाठी, अरे बाबा सरकार येणार आहे जाऊ नकोस, तुला महामंडळ देणार आहे, तुला समिती देणार आहे, हे सरकार पडणार आहे असं सांगण्याच प्रयत्न केला जात असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.
दरम्यान, राज्याचं राजकारण बदलत असून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आता पाय रोवत आहे. समोरच्यांना कितीही वाटत असेल हे सरकार पडणार आहे, हे सरकार जाणार आहे मात्र तरी हे सरकार टिकणार चालणार असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.
#राष्ट्रवादी_परिवार_संवाद यात्रेच्या तयारीनिमित्त आज जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. त्यात सहभागी झालो आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. @NCPspeaks @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks pic.twitter.com/ofTbRlHK9b
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 3, 2021
थोडक्यात बातम्या-
दारूड्यांनी रात्रीच्या वेळी ‘या’ अभिनेत्रीचा केला पाठलाग अन्…
अबब! या सेक्स रॅकेटवरील कारवाईनं पुण्यात खळबळ; इतक्या तरुणींना घेतलं ताब्यात
“महाविकास आघाडी सरकार फुटायला काही गंमत आहे का?, हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा”
“शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं ही सर्वांची इच्छा पण इतकी आदळआपट का?”
कोणताही प्रोपोगांडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही- अमित शहा
Comments are closed.