बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्यांचे वडील मास्तर होते त्यांनी 1200 कोटींची संपत्ती जमवली, याची चौकशी का नाही?”

जळगाव | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. गिरीश महाजन यांचे वडील शिक्षक होते. त्यावरून एकनाथ खडसे यांनी ज्यांचे वडील मास्तर होते त्यांनी हजार बाराशे कोटींची संपत्ती कशी जमवली?, असा सवाल करत गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं आहे.

‘मला ईडी लावली तर मी सीडी लावेल’, एकनाथ खडसे यांचं हे वक्तव्य चांगलचं चर्चेत होतं. त्यानंतर ईडीने एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई केली होती. आता ईडीचा काहीही संबंध राहिला नाही, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

एकनाथ खडसे यांनी माझे स्वत:चे घरवाडे होते. परंतु, ज्यांचे वडील मास्तर होते. त्यांनी हजार बाराशे कोटींची संपत्ती जमवली, त्यांची चौकशी का होत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. माझे प्रकरण आता न्यायालयात गेलं आहे. त्यावर न्यायालयचं काय तो निर्णय घेईल असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

दरम्यान, माझं नाव खराब करण्यासाठी विरोधक जिवाचं रान करत आहेत. नाथाभाऊंची ताकद माहित असल्यानेच विरोधक असं कृत्य करत आहेत, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

नितीन गडकरींकडून उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाचं तोंडभरून कौतुक म्हणाले…

नितीन गडकरींनी नगर जिल्ह्यासाठी केल्या ‘या’ तीन मोठ्या घोषणा!

खड्ड्यांवरुन ठाकरे बंधूंमध्ये जुंपली; अमित ठाकरेंच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

“साहेब आम्हाला ‘त्या’ गोष्टीची लाज वाटते, त्यांना वाटते की नाही माहित नाही”

काँग्रेस पक्ष हेडलेस असल्यानं भाजप नेते त्याचा फायदा घेत आहेत – संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More