Top News जळगाव महाराष्ट्र मुंबई

‘देवेंद्रजी ड्रायक्लिनर आपलाच होता ना मग…’; एकनाथ खडसेंचा फडणवीसांना सवाल

जळगाव | भाजप नेते एकनाथ खडसे यांनी त्यांना जाणूनबुजून डावललं गेलं असल्याचा आरोप पक्षावर केला होता. यावेळी खडसेंनी थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक सवाल केला आहे.

देवेंद्रजी, ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांना क्लीनचीट दिली गेली. जो आला त्याला क्लीनचीट मिळत होती. ड्रायक्लिनर तर आपलाच होता मग मी आलो की ते क्लीनचीट देऊ शकले नाहीत. त्यामुळे मला क्लीनचीट का देऊ शकले नाहीत हे विचारण्याचा मला अधिकार आहे म्हणून मी हे विचारत आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

ज्यांनी मला तिकीट देण्यासाठी अडथळे आणले आणि तिकीट देऊनही हरवण्याचा प्रयत्न केला. याचे सारे पुरावे मी दिले आहेत. सहा महिने झाले तरी अजुन कोणतीही कार्यवाही का करत नाही, असा सवालही एकनाथ खडसेंनी केला आहे.

दरम्यान, माझं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर कारवाई करायला विलंब का होतोय?, मी व्हिडीओ कॅसेट, वर्तमानपत्राची कात्रण आणि रेकॉर्डिंग दिलं आहे. परंतू अजुन कोणतीच कार्यवाही झाली नाही, संबंधितांना जाब विचारण्याची हिंमत पक्षामध्ये आहे का?, असंही खडसेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

SBI बँकेत लवकरच सुरु होणार भरती; निघणार ‘इतक्या’ जागा

“ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री आणि राऊत म्हणजे…”

आम्ही समजत होतो त्यापेक्षा ते जास्तच नॉटी निघाले; अमृता फडणवीसांचा राऊतांना टोला

अभिनेता प्रभासने आपल्या जिम ट्रेनरला भेट दिली ‘ही’ लक्झरी गाडी, किंमत ऐकून थक्क व्हाल!

कंगना राणावतने मुंबई पोलिसांची माफी मागावी, अन्यथा…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या