बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! एकनाथ खडसे बॉम्बे रूग्णालयात दाखल

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

एकनाथ खडसेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतंय. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याची माहिती समोर आली आहे .

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली होती. त्यानंतर ईडीकडून एकनाथ खडसे यांचीही 9 तास कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे ईडीला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं.

माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी दिला होता. त्यामुळे ईडीची चौकशी लागल्यानंतर एकनाथ खडसे काय करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

थोडक्यात बातम्या-

खुशखबर! पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता ‘या’ तारखेला मिळणार

एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे, नीरजकडून ऑलिम्पिक पदक मिल्खा सिंग यांना समर्पित!

“जाऊ तिथं खाऊ असं महाविकास आघाडी सरकारचं काम”

नरेंद्र मोदींचा नीरज चोप्राला फोन, कौतुक करत फोन ठेवताना म्हणाले…

दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, वाचा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More