Eknath Khadse | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मनातली खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची भाजपमध्ये वापसी होण्याची चर्चा रंगत आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या नेत्या तथा सुनबाई रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचार केला होता.
रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. इतकंच नाही तर, त्यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदीही वर्णी लागली आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्या की खडसे भाजपमध्ये जातील, असं म्हटलं जात होतं. मात्र, त्यांचा अजूनही प्रवेश झाला नाहीये. अशात एकनाथ खडसे यांचे माधुरी मिसाळ यांच्या सोबत चर्चा करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
एकनाथ खडसे आणि माधुरी मिसाळ यांचा व्हिडिओ व्हायरल
एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि माधुरी मिसळ यांच्या भेटी दरम्यानची चर्चा ही रेकॉर्ड झाली आहे. यामध्ये एकनाथ खडसे माधुरी मिसळ यांना मागून येणाऱ्यांना संधी मिळते. नव्याने संधी मिळते. आपल्याला सांगतात थांबा थांबा. हे वाईट आहे, असे बोलताना दिसून आले आहेत.
या चर्चेदरम्यान त्या ठिकाणी भाजप नेते अतुल भातखळकर देखील उपस्थित होते. आता एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य नेमकं कुणासाठी केलंय?, याबाबत आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
खडसे भाजपमध्ये जाणार?
काही दिवसांपुर्वी खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तेव्हा देखील त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. अशात हा व्हिडिओ आता समोर आल्याने या चर्चा पुन्हा वाढल्या आहेत. या व्हिडिओमधून सध्या तरी भाजपमधील अंतर्गत खदखद (Eknath Khadse) समोर आल्याचं म्हटलं जातंय.
News Title – Eknath khadse and Madhuri Misal Discussion
महत्त्वाच्या बातम्या
फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमध्ये, नेमकी काय चर्चा झाली?
करिना कपूरच्या सासूने केला मोठा खुलासा!
“राम मंदिराला गळती, पेपरला गळती..”; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे कडाडले
विधानसभेच्या ‘या’ 8 आमदारांनी दिले आमदारकीचे राजीनामे! नार्वेकरांनी दिली माहिती
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, पगारही मिळणार भरभक्कम; लगेच करा अर्ज