एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंना झापलं, सरकारलाही सुनावलं!

नागपूर | माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज सभागृहात आपल्याच सरकारविरोधात जोरदार भाषणबाजी केली. मंत्री पंकजा मुंडेंनाही त्यांनी चांगलंच झापलं. 

रोहियोवरील कामगारांना असंघटीत क्षेत्रातील कामगार म्हणून मान्यता आणि समावेश करणार का, असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला होता. ज्याला हा विषय केंद्राच्या अखत्यारित येतो म्हणून पंकजा मुंडेंनी बगल दिली. 

यावर आक्रमक होत एकनाथ खडसेंनी मी राज्य सरकारच्या योजनेबद्दल बोलतोय म्हणून सांगितलं. तेव्हा पंकजांनी विषयाची माहिती घेऊन सांगते म्हणून विषय संपवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, आपण विरोधात असताना ज्या मागण्या करायचो त्या सत्तेत येऊनही पूर्ण करत नाही, असा ठपका खडसेंनी आपल्याच सरकारवर ठेवला.