बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून चंद्रकांत पाटील भाजपमध्ये आले”

मुंबई | राष्ट्रवादी एकनाथ खडसेंना लिमलेटची गोळी देते की कॅडबरी देते याकडे आमचंही लक्ष असेल, अशी बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर केली. चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

चंद्रकांतदादा, तुमचा भाजपशी संबंध काय? तुमचं योगदान काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपमध्ये आलात, असं म्हणत खडसेंनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलंय.

चंद्रकांतदादा तुम्ही विद्यार्थी परिषदेत होता. काही तरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपमध्ये आला. तुम्हाला सर्व फुकट मिळालं. कोल्हापुरात आमदार, खासदार तर सोडा साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येतो का? असा सवाल खडसेंनी चंद्रकांत पाटलांना केलाय.

भाजपनं मला काहीही फुकट दिलेलं नाही. त्यासाठी मी माझं 40 वर्षाचं आयुष्य भाजपला दिलं आहे. मला फुकट मिळालं नाही. मनगटाच्या जोरावर मिळवलं आहे, असं खडसेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“राष्ट्रवादी नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देतं की कॅडबरी हे पाहावं लागेल”

“एकनाथ खडसे यांनी पक्षात येताना एकही अपेक्षा व्यक्त केली नाही”

“पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या पाहीजेत, मग राजकारणात मजा येईल”

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अजित पवार म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More