Top News

तुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी- एकनाथ खडसे

धुळे | आजवर भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. त्यामुळे तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला होता. यावर प्रतिक्रिया देत खडसेंनी महाजनांचा जोरदार समाचार घेतलाय.

एकनाथ खडसे यांनी आज धुळ्यात राष्ट्रवादीचा पहिलाच मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं. मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खडसेंनी गिरीश महाजनांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

ज्या पद्धतीची भाषा बोलत आहेत. हा निव्वळ अहंपणा आणि गर्विष्ठपणा आहे. या अहंकारामुळेच कार्यकर्ते भाजपला सोडचिठ्ठी देत आहेत, असं म्हणत एकनाथ खडसेंनी महाजनांवर टीकास्त्र सोडलंय.

माझ्या संपर्कात अनेक लहान मोठे कार्यकर्ते, नेते आहेत. पुढच्यावेळी जेव्हा मी धुळ्यात येईल, तेव्हा बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल, असा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“हिंमत असेल तर भाजपने हेडगेवार आणि सावरकरांच्या नावाने मते मागून दाखवावीत”

भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ!

“एकनाथ खडसे हे भ्रष्टाचारी आहेत, त्यांना आमदार करू नका”

‘हो, मी कुत्रा आहे कारण…’; कमलनाथांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर

जेम्स बाँड साकारणाऱ्या या अभिनेत्याचं 90 व्या वर्षी निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या