बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फोन टॅपिंगप्रकरणी एकनाथ खडसेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले…

जळगाव | फोन टॅपिंगवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या एका वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. माझाही फोन टॅप करण्यात आला होता, अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे. ते मुक्ताईनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मंत्रिमंडळामधून मला राजीनामा द्यायला लावला, तेव्हापासून माझा फोन टॅप केला जातो, असा मला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे तेव्हापासून माझी तक्रार आहे, असं एकनाथ खडसे म्हणालेत.

माझ्या तक्रारीनंतर ॲडिशनल चीफ सेक्रेटरीनी चौकशी केली होती, त्या कालखंडापासून तर आतापर्यंत मला शंका आहे की माझा फोन टॅप होत होता. तसे मला जाणवत होते. त्यामुळे त्यातील तथ्य काय आहे हे मी सरकारला पत्राद्वारे विनंती करणार असल्याचं एकनाख खडसेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केल्याचं प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. फोन टॅपिंगवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप झडत आहेत. तसेच फोन टॅपिंगच्या माध्यमातून राज्यातील काही नेते, पोलीस अधिकारी आणि इतर व्यक्तींची संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. या सगळ्याची माहिती फडणवीस यांच्या हाती लागली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केलीये.

थोडक्यात बातम्या- 

स्वबळावरच लढणार!; नाना पटोलेंच्या नव्या भूमिकेनं महाविकास आघाडीला मोठा धक्का

…म्हणून महाराष्ट्रातील ‘या’ भाजप आमदाराची थेट पोलीस कोठडीत रवानगी!

दोनदा कोरोना झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू पुन्हा आजारी, केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

सचिननंतर आता भारताच्या ‘या’ स्टार क्रिकेटपटूला देखील कोरोनाची लागण!

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More