Top News

राज्यात महाआघाडीचं सरकार येणार- एकनाथ खडसे

जळगाव | राज्यात महाआघाडीचंच सरकार येणार, असं वक्तव्य भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. त्यानंतर लगेचच खडसे यांनी आपली चूक सावरली. खडसे यांचा हा अनावधानपणा होता की काही वेगळं, अशी चर्चा आता रंगली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर रावेर येथे मंगळवारी महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारादरम्यान राज्यात सरकार महाआघाडीचंच येणार, असं वक्तव्य खडसे यांनी केलं. मात्र काही क्षणात त्यांनी सावरत आमच्याकडे नाथाभाऊला पाडण्यासाठी आघाडय़ा-बिघाडय़ा सुरू असल्याने महाआघाडी असं चुकून तोंडात आलं, अशी सारवासारव केली

भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर एकनाथ खडसे नाराज झाले होते. त्यांच्याशी राष्ट्रवादीचे नेते संपर्कात असल्याची चर्चाही होती.

दरम्यान, हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही. तर अर्जुन आहे. रणांगणातून बाहेर निघणं चांगलं जाणतो. तो कधी अडकणार नाही. मिल गया तो मिल गया, नही तो छोड दिया. तीर लगा तो ठीक है. नहीं तो कमान अपने पास है, असंही खडसे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या