बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जगात बापाला विसरून जाणाऱ्यांची संख्या कमी नाही”

जळगाव | राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला असल्याने गिरीश महाजन आत्मविश्वास गमावलेले नेते म्हणून राहिले आहेत. असा आत्मविश्वास गमावलेल्या नेत्यांच्या बळावर भाजप आता स्वबळावर निवडून येईल अशी शक्यता राहिली नाही, असा खोचक टोला एकनाथ खडसेंनी लगावला आहे.

गिरीश महाजन आता भाजपचे राष्ट्रीय नेते झाले आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासाठी लहान कार्यकर्ता झालो आहे.आत्ताच्या काळात बापाला विसरून जाणाऱ्यांची संख्या कमी नाही असं असलं तरी सगळ्या जगाला माहिती गिरीश महाजनांना राजकारणात कोणी जन्माला आणलं, कोणी घडवलं, असा घणाघात एकनाथ खडसेंनी केला आहे.

दरम्यान, गिरीष महाजनांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोण एकनाथ खडसे असा उल्लेख केला होता. गिरीश महाजनांच्या या टीकेला एकनाथ खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाचा Deltacron Varient वाढवतोय सर्वांची चिंता, अत्यंत महत्वाची माहिती समोर

अन् सकाळी सकाळी संजय राऊत भाजपवर बरसले, म्हणाले…

गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर बोचरी टीका, म्हणाले ‘ काहींना आजही…’

“किरीट सोमय्या कोण मला माहिती नाही, असे चु… देशात भरपूर आहेत”

मोठी बातमी! पुण्यात भाजप राष्ट्रवादीला शिवसेनेचा धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More