बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांत पाटील आपल्या मतावर ठाम नसतात, त्यांची मतं रोज बदलतात”

जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 22 वा वर्धापन दिन संपूर्ण महाराष्ट्रभरात उत्साहात साजरा झाला. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आणि पूर्वीचे भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर माध्यमांशी बोलताना टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील हे आपल्या मतावर कधीही ठाम नसतात, त्यांचे मतं सारखे बदलत असतात, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला आहे. यामुळे चंद्रकांत पाटील विरुद्ध एकनाथ खडसे असा वाद पेटण्याची चिन्ह दिसून येत आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन सोहळा साजरा करून आपल्या निवासस्थानी परतल्यावर एकनाथ खडसे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील आता एक बोलले आणि त्यानंतर बदलले, असे अनेक अनुभव मला आले आहेत. असं म्हणत एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपला जळगावमध्ये मोठ्या राजकीय नुकसानीचा सामना करावा लागला असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांवर केलेल्या या टीकेवर चंद्रकांत पाटील नेमकी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अजित पवार विरुद्ध चंद्रकांत पाटील असा वाद पेटला असतानाच आता एकनाथ खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असा नवा वाद उफाळून येणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

अजब प्रकार! कोरोना लस घेतल्यानंतर नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या वस्तू अन्…..

ऑनड्यूटी रोमँटिक व्हिडीओ बनवणं पोलीस जोडप्याला पडलं महागात, पाहा व्हिडीओ

देशात एका दिवसात सर्वाधिक मृतांची नोंद; नव्या बाधितांची संख्या 1 लाखांच्या आत

चेहरा झाकलेल्या ‘या’ महिलेने तरुणासोबत केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

लॉकडाऊनमुळे ‘हा’ अभिनेता झाला बेरोजगार; पैशांसाठी विकावी लागली आवडती बाई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More