महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांच्या उपस्थित एकनाथ खडसेंचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश!

मुंबई | भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी काल दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

40 वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही, विधानसभा निवडणुकीत मानहानी आणि छळ, सभागृहात पुरावे देण्याची विनंती केली, मात्र आजवर प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, असं खडसे म्हणाले.

भाजपसाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करेन, कोणत्याच पदाची अपेक्षा नाही, असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीतील रुग्णालयात दाखल

‘भारत विषारी वायू सोडणारा देश’; डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर टीका

“एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल”

‘एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो’; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या