महाराष्ट्र मुंबई

खडसेंच्या हातातील ‘फडणवीस हटाओ’चा फलक खरा आहे का?, खडसे म्हणतात…

मुंबई | कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने आज ठाकरे सरकारच्या विरोधात राज्यव्यापी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याची हाक देण्यात आली. या आंदोलनात माजी मंत्री आणि नेते एकनाथ खडसे यांनीही सहभाग घेत आपल्या अंगणात शासनाचा निषेध केला आहे.

काहीवेळाने खडसे यांच्या हातात ‘फडणवीस हटाओ, महाराष्ट्र बचावो’चा फलक असलेला फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. मात्र हा फोटो एडिट करून कुणीतरी पोस्ट केलेला आहे, असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलं आहे.

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हा फोटो व्हायरल झाला. ट्विटरसह अन्य सोशल मीडियातही हा फोटो वापरून अनेकांनी पोस्ट केल्या. खडसे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने स्पष्टीकरण दिलंय.

एकनाथ खडसे यांनी आपल्या मुक्ताईनगरातील कोथळी गावातील घरासमोर सरकारविरोधात आंदोलन केले. मोजके कार्यकर्ते आणि सोबत खासदार रक्षा खडसे यांनीही यावेळी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“घराचं रणांगण फक्त कौरवांनी केलं होतं आणि आज भाजपने”

कोरोनाबाबत शासनानं काहीच न करता विरोधकांना सहकार्य करायला सांगणं चुकीचं- चंद्रकांत पाटील

महत्वाच्या बातम्या-

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅडची सोय करा; चाकणकरांची सहकाऱ्यांना विनंती

सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांची हजेरी

आजचं आंदोलन भाजपच्या अंगलट?; सोशल मीडियावर #महाराष्ट्रद्रोहीBJP ट्रेंड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या