बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ईडी’च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो, पण माझं तसं नाही- गिरीश महाजन

जळगाव | जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासूनची भाजपची सत्ता पलटवण्यात शिवसेनेला यश आले. यामागील सूत्रे कशी हलवली, याबाबत एकनाथ खडसे यांनी सविस्तर सांगितले. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. याच दरम्यान गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त होते. आता कोरोनामुक्त झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार पलटवार केला आहे.

एकनाथ खडसे यांना ‘ईडी’च्या नोटिसा आणि तारखांमुळे कोरोना होतो. पण माझे तसे नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. मला एकदाच कोरोना झाला. दहा दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. सोमवारी केलेला माझा अहवाल निगेटिव्ह आला. मला कोरोना होतो, तो ‘ईडी’च्या तारखा पाहून होत नाही. सन्मानीय नेते एकनाथ खडसे यांना ‘ईडी’ची तारीख आली की, लगेच कोरोना होतो. ते खासगी हॉस्पिटलमध्ये जातात किंवा घरीच क्वॉरंटाइन होतात. मुंबईत फिरतात. माझे तसे नाही. मला एकदाच कोरोना झाला. माझ्या पूर्ण कुटुंबाला झाला. आम्ही सर्वांनी सरकारी दवाखान्यात उपचार घेतले. खोटी सर्टिफिकेट्स जोडून मुंबईतील हॉस्पिटलला जात नाही, असं म्हणत त्यांनी खडसेंवर हल्लाबोल केला.

कोरोनाची लागण झाल्याचे समजताच गेल्या दहा दिवसांपासून गिरीश महाजन यांच्यावर उपचार सुरू होते. महाजनांनी नुकत्याच केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर महाजन यांनी जळगावात येऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाहणी करून आरोग्य यंत्रणा व कोरोना उपाययोजनेचा आढावा घेतला,यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, गिरीश महाजन हे नियमित व्यायाम करून फिट राहतात. तरुण नेते म्हणून ते परिचित आहेत. गिरीश महाजन यांना झालेला कोरोना खरा आहे की, जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्याचा हा कोरोना आहे. याचा तपास केला पाहिजे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वामध्ये गर्विष्ठपणा आहे. नगरसेवकांना तुच्छ लेखणे, स्थानिक मागण्यांकडे दुर्लक्ष करणे हे होत होते, अशी टीकाही एकनाथ खडसेंनी केली होती.

थोडक्यात बातम्या – 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More