Top News महाराष्ट्र मुंबई

विनयभंगाच्या तक्रारीतून खडसे अजून सुटलेले नाहीत- अंजली दमानिया

मुंबई  | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर विनयभंगाची तक्रार केली, असं म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंनी आपल्याला खूप छळले,असा आरोप अंजली दमानिया यांनी खडसेंवर केला आहे.

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, दमानियांनी केलेल्या तक्रारीतून मी अलीकडेच सुटलो. खडसेंनी केलेले हे विधान खोटं असून, माझ्या तक्रारीतून ते अजून सुटलेले नाहीत.

मुक्ताईनगरमध्ये झालेल्या खडसेंच्या वाढदिवसांच्या आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपल्याबद्दल अत्यंत अश्चिल, असभ्य भाषा वापरली होती. जर जाहीर सभेत माझ्याविरोधात काहीही बोलले जात असेल तर मी गप्प का रहायचे?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, अंजली दमानिया यांनी या प्रकरणाविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तसेच खडसेंना धडा शिकवणारच हा निर्धार मी सुरुवातीपासूनच केला असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यायला लागलं -एकनाथ खडसे

…म्हणून वडिलांच्या पाठोपाठ रोहिणी खडसेही भाजपला ठोकणार रामराम!

“पश्चिम महाराष्ट्रातील पुरावेळी केंद्राकडून 900 कोटीही आले की नाही शंका”

‘जर मला मोदींकडून प्रतिसाद मिळाला नाही तर…’; सुब्रमण्यम स्वामींचा इशारा

“ठाकरे सरकारला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या