बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ खडसे यांना ईडीचा दणका; अटकेत असलेल्या जावयाबाबत ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

मुंबई | भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडुन 5 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना 15 जुलै रोजी मुदतवाढ करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणात आता गिरीश चौधरी यांच्या अटकेत 20 जुलै पर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांना ईडीने मोठा दणका दिल्याचं बोललं जात आहे. एकनाथ खडसे महसुलमंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भोसरी एमआयडीसीतील जमीन आपली पत्नी व जावयाला मिळवुन दिल्याच्या आरोपानंतर त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जमीन खडसेंच्या पत्नी आणि जावई यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून 3 कोटी 75 लाख रूपयांना खरेदी केली होती. सदरील जमिनीचे 37 लाख एवढे मुद्रांक शुल्कही भरण्यात आले होते. सर्व प्रक्रियेनंतर ही जमिन भोसरी एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं पुढे आलं आहे. विशेष म्हणजे पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या सर्व व्यवहाराची नोंद करण्यात आली आहे.

या सर्व प्रकरणात 4 जून 2016 ला तत्कालीन महसुलमंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. तसेच आता भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांच्या मागचा ईडीचा ससेमिरा अद्याप सुटत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

 

थोडक्यात बातम्या 

येत्या निवडणूकीमध्ये एखादा उमेदवार निवडून नाही आला तरी चालेल, पण…, – देवेंद्र फडणवीस

मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही- अमोल मिटकरी

“ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त आहेत”

“केवळ याच जन्मात नाही तर पुढील जन्मातही पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील”

‘…म्हणून गेले दोन-तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले नाहीत’; रोहीत पवारांनी सांगितलं कारण

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More