Top News महाराष्ट्र मुंबई

आज एकनाथ खडसेंचा जाहीररित्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार!

मुंबई  | गेले 40 वर्षापासून राजकारणात सक्रीय असलेले भाजप पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीररित्या प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा प्रवेश होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश होणार असून त्यांच्या या प्रवेशासाठी काल दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे आहे.

एकनाथ खडसे यांनी बुधवारी 21 ऑक्टोबर रोजी भाजप पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, “आज मी प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे. गेले 40 वर्ष भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहचला नव्हता, तिथे आम्ही पोहचवला.”

“काही मिळालं, नाही मिळालं याचं दु ख नाही. पण देवेंद्र फडणवीसांनी छळले . मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे,” असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पक्ष सोडण्याची वेळ का आली याचं खडसेंनी आत्मचिंतन करावं; गिरीश महाजनांचा टोला

कोरोना लशीच्या निर्मितीसाठी भारताची तयारी सुरु; केंद्राकडून ‘इतक्या’ कोटींची तरतूद

…म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यायला लागलं -एकनाथ खडसे

…म्हणून वडिलांच्या पाठोपाठ रोहिणी खडसेही भाजपला ठोकणार रामराम!

“पश्चिम महाराष्ट्रातील पुरावेळी केंद्राकडून 900 कोटीही आले की नाही शंका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या