एकनाथ खडसेंनी घेतली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट?

एकनाथ खडसेंनी घेतली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट?

दिल्ली | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्याचं कळतंय. सामना वृत्तपत्राने विश्वनीय सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिलीय.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासोबत एकनाथ खडसे यांनी औरंगाबाद ते दिल्ली प्रवास केला. सुरुवातीला ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटले. त्यानंतर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतल्याचं कळतंय. 

दरम्यान, मोहन प्रकाश आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत प्रवास केला हे खरं आहे. मात्र त्याचा राजकीय अर्थ लावू नये. गडकरींना शहाद्यातील साखर कारखान्याच्या प्रकल्पाच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. 

Google+ Linkedin