राज्यातील भाजप नेत्यांकडून एकनाथ खडसेंची अवहेलना, मोठा निर्णय घेणार!

Eknath Khadse l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तब्बल 40 वर्षे भाजपमध्ये काम करणाऱ्या आमदार एकनाथ खडसे यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग रखडला आहे. कारण एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर करून देखील अद्याप त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांची अवहेलना झाल्याचे दिसून येत आहे.

एकनाथ खडसे मोठा निर्णय घेणार? :

राज्यातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरही अजूनपर्यंत त्यांना पक्षात प्रवेश दिला नसल्याचे दिसून येत आहे. कारण एकनाथ खडसे यांनी थेट दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांशी यासंदर्भांत चर्चा केली होती. परंतु कित्येक महिने उलटून देखील त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अजूनही लागत नाही. त्यामुळे एकनाथ खडसे नाराज आहेत.

अशातच आता या नाराजीमुळे ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. भाजप पक्षप्रवेशाबाबत अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने मी आता पुढचा विचार करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवले आहे.

Eknath Khadse l एकनाथ खडसे नेमके काय म्हणाले? :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होत. त्यासंदर्भातील निर्णय त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर देखील केला होता. मात्र अजूनही त्यांना भाजप पक्षप्रवेशाबाबत कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे मी आता पुढचा विचार करणार आहे किंवा मी माझ्या राष्ट्रवादीचे काम करेल, असे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

तसेच माझी भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असल्याने मी वरिष्ठांसोबत चर्चा देखील केली होती. मात्र भाजपकडून मला पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे. तसेच आमदार देखील आहे. त्यामुळे मी माझा राजीनामा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिलेला आहे. परंतु त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांनी माझा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. तसेच मला शरद पवार साहेबांनी देखील आमदारकीचा राजीनामा देण्याबाबत मनाई केलेली आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

News Title :  Eknath Khadse no entry into BJP 

महत्वाच्या बातम्या-

सणासुदीत सोने-चांदी स्वस्त होणार की महागणार? जाणून घ्या आजचा तोळ्याचा भाव

विधानसभा तोंडावर असतानाच अजित पवारांच्या अडचणीत वाढ!

माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर!

ऐन सणासुदीत महागाईचा भडक, भाजीपाल्याचे दर पोहोचले शंभरी पार

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर आले की नाही? अशाप्रकारे चेक करा