Top News जळगाव महाराष्ट्र

 ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ या नावाचे मी पुस्तक लिहिणार- एकनाथ खडसे

जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी म्यान केलेली आपली तलवार पुन्हा एकदा उपसली आहे. त्यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आपण ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

मुख्यमंत्रिपदाचा प्रबळ दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला. माझ्यावर धादांत खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळे याला त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी भेट दिली?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला आहे.

मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची तिकिटं कापली. याच कारणामुळे राज्यात भाजपचे सरकार येऊ शकले नाही, असंही खडसे म्हणाले.

जो व्यक्ती विरोधी पक्षनेता असतो तोच मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मला मुख्यमंत्रिपद न मिळता फडणवीसांना मिळालं. नंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार आहे, हे लक्षात आल्यानंतर माझ्याविरोधात एक षडयंत्र रचलं गेलं. ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत माझ्यावर एकही आरोप झाला नाही, मात्र सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच माझ्यावर एका मागून एक आरोप केले गेले, हा त्या षडयंत्राचाच भाग होता, असा आरोपही खडसेंनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

PUBG ला आता FAU-G चा पर्याय; अक्षय कुमारने केली घोषणा

ना भूले है, ना भूलने देंगे, भाजपने छापले सुशांतचे स्टिकर्स

पत्रकारांना 50 लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेणार- राजेश टोपे

सुशांत आत्महत्याप्रकरणी नोकर दिपेश सावंतला अटक

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच; पाहा गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या