जे माझ्या मनात, ते मी अजितदादांच्या कानात सांगितले!

एकनाथ खडसे

जळगाव | सतीशराव, तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही. माझ्या मनात जे आहे ते मी अजितदादांच्या कानात सांगितलंय, अशा शब्दात एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांना उत्तर दिलं. 

जळगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत हजेरी लावली. यावेळी सतीश पाटील यांनी आम्हाला खडसेंचं नेतृत्व मान्य असल्याचं वक्तव्य केलं. त्याला खडसेंनी उत्तर दिलं. 

दरम्यान, खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला असला तरी अजित पवारांच्या कानात नेमकं काय सांगितलं?, याबद्दल सध्या उलटसूलट चर्चा सुरु आहेत.