मुंबई | महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केलीये. राष्ट्रवादीकडून राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून खडसे यांचं नाव जवळपास निश्चित केलं आहे.
सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांची निवड केली आहे तर यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून माझ्या नावाची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांकडे केलीये, याचा मला आनंद झालाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मी आभार मानतो, असं खडसे यांनी सांगितलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून इतर 3 जणांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार आहे. यामध्ये गायक आनंद शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, साहित्यिक, प्रा. यशपाल भिंगे यांचीही नावं जवळपास निश्चित झालीये.
महत्त्वाच्या बातम्या-
RCBचं जेतेपदाचं स्वप्न यंदाही भंगलं; हैद्राबादची बंगळूरूवर 6 गडी राखत मात
स्वत:ला अटक करणार का?;निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
“शेतकऱ्याला दिलेली मदत म्हणजे कोपराला गूळ लावायचा व हाताला चाटायचा”
नितीशकुमार यांनी दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाले…
पुण्यात महाविकास आघाडीला सर्वात मोठं यश; भाजपला मोठा धक्का!