Top News

भाजपची गोची; आता खडसेच म्हणतात, त्यावेळी सेनेनं आम्हाला अंधारात ठेवलं नाही

मुंबई | 2014 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून काँग्रेसला प्रस्ताव देण्यात आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. यावरुन भाजप नेत्यांनी शिवसेनेला धारेवर धरलं होतं. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते एखनाथ खडसे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

2014 विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना स्वतंत्र लढली होते. त्यामुळे निर्णय घेण्याचा शिवसेनेला पूर्ण अधिकार होता. त्यामुळे शिवसेनेनं भाजपला अंधारात ठेवले हा प्रश्नच निर्माण होत नाही, असं म्हणत खडसे यांनी एकप्रकारे भाजपची गोची केली आहे.

2014 मध्ये भाजपने स्वत:च्या जीवावर निवडणूक लढवली. भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्याची शक्यता वाटल्याने अन्य पक्षांनी एकत्र येण्याचा विचार केला असावा. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यात तथ्य असावे, असंही खडसे म्हणाले आहेत.

सरकार स्थापन करण्यासाठीचे वेगवेगळे प्रयोग यापूर्वीही करण्यात आले आहेत. 2019 मध्ये आम्ही एकत्र लढलो, मात्र मतभेद निर्माण झाल्याने सत्ता स्थापन करता आली नाही, असं ते म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

मोदींची तुलना पुन्हा शिवरायांशी झाल्याने राऊतांचा संताप अनावर; म्हणाले…

हिंमत असेल तर मंत्रालय 24 तास चालू ठेव; ‘नाईट लाईफ’वरुन राणेंचा हल्लाबोल

शिवरायांची मोदींशी आणि तानाजींची अमित शहांशी तुलना; व्हिडीओ व्हायरल

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या