बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पवार साहेब तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला हे बरं झालं, नाहीतर मी…- एकनाथ खडसे

मुंबई | एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना खडसे भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

पवार साहेब तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला हे बरं झालं. नाही तर मी गेलोच होतो. चार वर्षानंतर आज मन हलकं झालं, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली.

भाजपने मला काहीच दिलं नसतं. त्यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मार्गदर्शकाच्या भूमिकेत ठेवलं असतं. तुम्ही ज्येष्ठ झालात आता मार्गदर्शन करा, असं सांगितलं असतं. ज्यांना पक्षात येऊन चार दिवस झाले नाहीत, त्यांनी मला हे सांगितलं असतं, असंही एकनाथ खडसेंनी म्हटलं.

पवार साहेब मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला. नाही तर मी गेलोच होतो. राजकीय जीवनातून उठलो असतो, असं खडसे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“राष्ट्रवादी नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देतं की कॅडबरी हे पाहावं लागेल”

“एकनाथ खडसे यांनी पक्षात येताना एकही अपेक्षा व्यक्त केली नाही”

“पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या पाहीजेत, मग राजकारणात मजा येईल”

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अजित पवार म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More