बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपवर टीका करत एकनाथ खडसेंचा महाविकास आघाडीला घरचा आहेर, म्हणाले…

जळगाव | गुरूवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास (Maharashtra Budget Session 2022) सुरूवात झाली आहे. अनेक मुद्यांवरून अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)
यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणानंतर राजकारण करता आलं असतं, त्यांना अभिभाषण पुर्ण करू द्यायला हवं होतं, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी घोषणा प्रतिघोषणा दिल्या. त्यावरून एकनाथ खडसेंनी कान टोचले आहेत. त्याचबरोबर त्यांनी ओबीसी आरक्षणावर देखील भाष्य केलं आहे.

एकनाथ खडसे यांनी यावेळी बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाविषयी दिलेला निर्णय अत्यंत दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अहवाल अमान्य केला आहे. दुर्देवाने राज्य सरकार कमी पडले असून केंद्र सरकारने इम्पिरिकल डाटा राज्य सरकारला दिला असता तर तीन महिन्यांमध्ये मागासवर्गीय आयोगाला कसरत करावी लागली नसती, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपवर काही गंभीर आरोप केले आहेत. भाजपला इक्बाल मिर्चीने फंड पुरवला होता.  इक्बाल मिर्ची हा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे.  इक्बाल मिरचीकडून तुम्ही फंड घेता आणि याठिकाणी व्यवहार झाला म्हणता. यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“…तर ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही”

नवाब मलिक यांचा जामीन फेटाळला; वाचा न्यायालयात नेमकं काय घडलं?

आदित्य ठाकरेंच्या एन्ट्रीची एकच चर्चा; राज्यपालांच्या अभिभाषणावर म्हणाले…

“राज्याच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचं नाव डांबराने लिहिलं जाईल”

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More